◼️ विद्यार्थांना अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : विद्योतेजक वैश्य समाज, रत्नागिरी या संस्थेमार्फत रत्नागिरी तालुक्यातील वैश्य समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदत दिली जाते. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या दहावी व बारावी तसेच पदवी परिक्षांमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व आर्थिक मदत देण्याचे संस्थेने ठरविले असून त्यानुसार विद्यार्थ्यांनी अगर त्यांच्या पालकांनी आवश्यक अर्ज व माहिती संस्थेच्या आठवडा बाझार, पाटीलवाडी रोड, रत्नागिरी येथील कार्यालयात किंवा श्री. योगेश मलुष्टे, C/O. मे. मलुष्टे बिडी दूकान, राधाकृष्ण मंदिर नाका, रत्नागिरी येथे दि. २१ जानेवारी २०२५ पर्यंत संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स, आपला रहिवासी पत्ता व संपर्कासाठी मोबाईल अथवा फोन नं. नमुद करून अर्ज सादर करावेत.
मुदतीत आलेल्या अर्जाचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, त्यांनी आपणास कोणत्या कामासाठी व किती आर्थिक मदतीची आवश्यकता आहे ते सकारण अर्जामध्ये नमुद करावे. शिष्यवृत्तीसाठी व आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र अर्ज असणे आवश्यक आहे.
वरील मुदतीत सादर झालेल्या अर्जाची संस्थेकडून छाननी केली जाईल व शिष्यवृत्ती / आर्थिक मदतीचे वाटपाबाबत दिनांक व वेळ ठरवून दिली जाईल त्यावेळी उपस्थित राहून सहकार्य करावे.
संस्थेकडे आलेला अर्ज स्विकारणे अगर नाकारणे तसेच त्यामधील मागणीमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेने राखून ठेवले आहेत, असे कळविण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 15-01-2025
