रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी आयोजित बँकर्स प्रीमिअर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. या उपविजेत्या संघाचे कर्णधार कुणाल दाभोळकर यांचे व संघाचे बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अभिनंदन केले.
बँक ऑफ इंडिया रत्नागिरी यांनी दि. ११ व १२ रोजी बँकर्स प्रीमिअर लीग २०२५ चे आयोजन केले होते. या स्पर्धा चंपक मैदान रत्नागिरी येथे उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ बँकांच्या संघानी सहभाग नोंदविला. या क्रिकेट स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संघ उपविजेता ठरला असून, नितेश मोहिते यांनी उत्कृष्ट गोलंदाजचा मान पटकावला.
संघाचे कर्णधार कुणाल दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संघाने उपविजेता पदाचा मान मिळविला असून, कर्णधार कुणाल दाभोळकर यांसह संपूर्ण संघाचे, बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वर्षी विजेता पद पटकवावे, अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी बँकेचे संचालक अॅड. दीपक पटवर्धन, कर्मचारी प्रतिनिधी संचालक जितेंद्र साळवी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. एस. पी. गिम्हवणेकर, एस. के. खेडेकर व बँकेचे कर्मचारी यांनी संघाचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 15/Jan/2025