चिपळूण : असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम आता महाराष्ट्र इंटकने युद्धपातळीवर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. असंघटित कामगारांची संख्या वाढत असून त्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरून दौरा करून त्यांना संघटीत करण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात येणार असल्याचे कुंभार्लीचे (ता. चिपळूण) सुपुत्र व महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले.
महाराष्ट्र इंटकच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच मुंबईत झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम होते. यावेळी महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी असंघटित कामगारांना संघटित करण्याचा ठराव संमत केला. ते म्हणाले, गेल्या दहा-पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अनेक उद्योगात असंघटित कामगारांची संख्या वाढत आहे. त्यांच्याकडून कायम कामगारांचे काम करुन घेण्यात येते. परंतु वेतन मात्र किमान वेतनापेक्षा कमी देण्यात येते. अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनीही मार्गदर्शन केले. ३ मे रोजी अधिवेशन घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 15/Jan/2025
