रत्नागिरी : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात एक चोराने धारदार शस्त्राने हल्ला केला, ज्यामुळे सैफ गंभीर जखमी झाले. या घटनेच्या वेळी त्याची पत्नी करीना कपूर घरात नव्हती, ती सोनम कपूरच्या घरी पार्टीला गेली होती.
सैफ अली खान आणि चोरामध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर चोराने हल्ला चढवला. सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जोरदार हल्ला चढवण्यात आला, ज्यामुळे त्याला मोठे घाव पडले. या हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.
करीना कपूर तेव्हा सोनम कपूरच्या घरी पार्टीला गेली होती, जिथे ती तिची बहीण करिष्मा कपूर आणि रिया कपूर यांच्यासोबत गर्ल नाइट एन्जॉय करत होती.
चोरी करायच्या उद्देशाने हा व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. कुटूंबियांची याबद्दल चौकशी सुरु आहे आणि पोलीस अधिक माहिती घेत आहेत. सैफ अली खान शुद्धीत आल्यानंतर त्याच्याकडून अधिकची माहिती घेण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 16/Jan/2025
