चिपळूण : पिंपळी नुरानी मोहल्ला येथे मारामारी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

चिपळूण : पिंपळी नुरानी मोहल्ला येथे गर्दी जमवून मारामारी केल्याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळी मोहल्ला येथील महंमद जाफर आत्तार (वय ५६) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १२ जानेवारीला आत्तार यांच्या जागेत महावितरणचे कर्मचारी विजेचे खांब टाकत होते. त्यांना झाड अडचणीचे वाटल्यामुळे त्यांनी ते झाड तोडण्यास सांगितले. त्यावेळी मौजम शाबुद्दीन तांडेल तेथे आला त्याने झाड तोडायचे नाही, असे सांगितले. त्यानंतर अत्तार यांना नुरानी मोहल्ला येथे बोलून घेतले. तांडेल याच्यासह करमत बाबा तांडेल, मुबारक बाबा तांडेल, शाबद्दीन तांडेल व त्यांची पत्नी यांनी आत्तार व मुल्ला यांना मारहाण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 16/Jan/2025