रत्नागिरी : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्यावतीने लोकनेते कै. शामराव तथा अण्णासाहेब पेजे यांची १०८ वी जयंती १७ रोजी सकाळी १० वा. साजरी केली जाणार आहे. स्व. पेजे यांच्या रत्नागिरी माळनाका येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कुणबी भवन जे. के. फाइल्स रत्नागिरी येथे अभिवादन सभा घेण्यात येणार आहे.
‘जगावं कसं व कशासाठी’ हा जीवन आदर्श घालून देणाऱ्या लोकनेते शामराव तथा अण्णासाहेब पेजे हे कोकणातील कुणबी व बहुजन समाजातील लोकांचे महनीय नेते, कष्टकरी वर्गाचे कैवारी म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. कुणबी व बहुजन समाजाचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने, प्रकर्षाने मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले. अशा या लोकनेते शामराव तथा अण्णासाहेब पेजे यांच्या १०८ व्या जयंती निमित्त १७ जानेवारी रोजी जयंती साजरी केली जाणार आहे. कुणबी, ओबीसी, बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व कुणबी संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा, रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ गराटे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 16/Jan/2025
