रत्नागिरी : राज्य क्रिडादिनानिमित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत स्वप्निल घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाली कुस्ती केंद्रातील तब्बल नऊ कुस्तीपटूंनी सुवर्ण पदक पटकावले.
12 जानेवारी रोजी रत्नागिरीत पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत पाली कुस्ती केंद्रातील नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सर्व खेळाडू स्वप्निल घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाली येथे कुस्ती सराव करतात. नियमित व्यायाम व सरावामुळे सर्व खेळाडूंनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी अतुल गराटे (65 किलो) भावेश सावंत (57 किलो) साहिल खटकूळ (79 किलो) तर कुमार गटात कीर्ती सावंत (55 किलो), वेदांत नागले (55 किलो), गौरव नागले (71 किलो), वरद ताम्हणकर (80 किलो), दुर्वांक नागले (110 किलो), महिला गटात सायली यादव 55 किलो या विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्वांची निवड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 16-01-2025
