रत्नागिरी पालिकेच्या छंद वर्गाचा उत्साहात समारोप!

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या छंदवर्गाचा मंगळवारी (२८ एप्रिल) समारोप झाला.

यावेळी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण करण्यात आले.

नगरसेविका, तसेच दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते.

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या छंद वर्गात सहभाग घेतला. बागकाम, चित्रकला, कागदकाम, कुंभारकाम आणि मनोरंजनाचे खेळ अशा विविध विषयांचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. रत्नागिरी पालिकेतर्फे प्रथमच अशा छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसह अन्य शाळांमधील मुलेही छंद वर्गात सहभागी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 29-04-2026