Saif Ali Khan : 12 मजले पायऱ्या चढून चोर सैफ च्या घरात घुसला!, पोलिसांनी दिलेली माहिती जशीच्या तशी..

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. हल्लेखोराने फायर एस्केपचा यूज करून 12 मलजी पायऱ्यांवरून घरी प्रवेश केला आणि हा हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

यामागचा उद्देश हा चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून पुढे आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. आरोपीला अटक करणे हे आमचं पहिलं ध्येय असून त्यानंतर पुढच्या घडामोडी उघड होतील अशी माहिती मुंबई पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली.

मुंबई पोलिसांनी काय माहिती दिली?

रात्री अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला त्यामागे एक आरोपी आहे. फायर एस्केप यूज करुन, 12 मजली पायऱ्या चढून हा चोर घरात घुसला होता असं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. चोरी करणे हाच या घटनेमागचा प्राथमिक उद्देश होता असंही तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपीला ओळखलं गेलं आहे, पायऱ्यांवरुन तो घरात शिरला होता. त्याला पकडल्यानंतर पुढची माहिती मिळू शकेल.

आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची 10 तपास पथकं कार्यरत आहेत. रात्री आरोपीच्या हालचाली जिथे जाणवल्या, त्यानुसार शोध सुरु आहे. चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाला हे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपीला अटक करणे हेच आमचं पहिलं ध्येय आहे, आरोपीच्या अटकेनंतर पुढच्या घडामोडी उघड होतील.

शेजारच्या इमारतीतून उडी मारून चोराचा प्रवेश

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चोराने शेजारील इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत उडी मारून प्रवेश केल्याचं समोर आलं. चोर शेजारील इमारतीतून उडी मारून आल्याचं सीसीटीव्हीत चित्रित झालं आहे.

सैफच्या घराची रेकी केली होती

चोरी करण्यापूर्वी या चोराने सैफ अली खानच्या घराची संपूर्ण रेकी केल्याचं समोर आलं. इमारतीच्या मागच्या बाजूला फक्त एकच वॉचमन असतो हे त्याला माहिती होतं. तसेच इमारतीच्या 12 व्या मजल्यावर सैफ आणि करिना राहतात याचीही माहिती चोराने आधीच घेतली होती. तसेच सैफच्या घरात किती लोक असतात याची माहिती चोराला होती.

नेमकं काय घडलं?

अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेमधील राहत्या घरात चाकू हल्ला झाला. सैफच्या घरी काम करणाऱ्या एरियामा फिलिप्स उर्फ लिमा याच्या तक्रारीच्या आधारावर वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर ट्रेस पासिग, चोरीसह जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सैफच्या घरात शिरला त्यावेळी काही शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी लिमा यांनी त्याला हटकल्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला चढवला. आरडाओरड एकूण सैफ अली खान त्या ठिकाणी मदतीला आला. या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी प्रतिकार करताना आरोपीने सैफ अली खानवर हल्ला चढवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सैफ अली खानवर शस्त्रक्रिया यशस्वी

अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेमधील राहत्या घरात चाकू हल्ला झाला. सैफ अली खानवर 6 वार करण्यात आले असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम खानने सैफला रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली. हात आणि पाठीवरही वार करण्यात आला आहे. पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आले असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली.

सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याला आता आयसीयूमध्ये स्थलांतरित करण्यात आलं असून आज त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 16-01-2025