देवरुख येथे कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण

साडवली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अधिनस्त कृषी विज्ञान केंद्र, लांजामार्फत देवरुख येथे कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण दि. १३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत झाले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद हणमंते यांनी व्यवसाय विषयक सखोल मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणादरम्यान रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राकेश यादव व अशोक साळुंखे यांनी कर्ज प्रकरणाबद्दल माहिती दिली तसेच पशुसंवर्धन अधिकारी, सावर्डेतील डॉ. बालाजी डोंगरे यांनी लसीकरणांची माहिती दिली. डॉ. सोनाली शेट्ये पशुधन विस्तार अधिकारी पं. स. देवरूख यांनी विविध योजनेची माहिती दिली. हणमंते यांनी एक दिवसीय पक्षांची निवड, पिलांचे संगोपन, खाद्य वेवस्थपण, पिल्लांचे लसीकरण, पक्ष्यांची विक्री, व्यवस्था या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण समारोप प्रसंगी संतोष पाटील, सहायक निबंधक यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी हेमंत तांबे, निवृत्त कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र येथील साळवी, गावित यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 20/Jan/2025