गुहागर महसूलतर्फे ७ कलमी आराखड्यास उमराठ येथून सुरुवात

गुहागर : गुहागर तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार कार्यालय गुहागर यांच्या वतीने महसूल विभागातील मुख्यमंत्री यांच्या क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडानुसार कार्यक्रम अंतर्गत शिबिरांना तालुक्यातील उमराठ येथून सुरुवात करण्यात आली.

तालुक्यातील हेदवी तलाठी सजाच्या कार्यक्षेत्रातील महसूल गाव उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे श्री देव भराडा मंदिर सभागृहात दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आधी सदर शिबिरासंदर्भात हेदवी सजाचे ग्राम महसूल अधिकारी सुशिल परिहार यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून ग्रामस्थांना आवाहन केले होते. आपण आपले महसूल विभागाकडील असणारे कामे घेऊन अर्जासह सदर शिबिरात महसुली कामे असणारे जास्तीत जास्त खातेदार, नागरिक यांनी हजर राहावे तसेच सदर कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारीसुद्धा भेट देऊन मार्गदर्शन करणार असून आपली महसूल विभागाकडील कामांची पूर्तता लवकरात लवकर करता येतील, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व महसूल विभागाकडील असलेली कामे १०० टक्के पूर्ण करणेस विषयानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सहकार्य करावे, अशीही विनंती ग्राम महसूल अधिकारी सुशिल परिहार यांनी केली होती.

शासनाच्या निर्देशानुसार शंभर दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडानुसार खालील कामांची माहिती ग्राम महसूल अधिकारी सुशिल परिहार यांनी मंडळ अधिकारी संतोष सावर्डेकर यांच्या उपस्थितीत दिली. संतोष सावर्डेकर त्यांनीसुद्धा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी अधिकार अभिलेख (सात बारा) अद्ययावत करणे यासाठी संबंधितांचे अर्ज घेणे (म.ज.म.अ.१९६६ चे कलम १५५ प्रमाणे) व राजपत्राने नावात दुरूस्ती, भोगवटादार वर्ग दुरूस्ती इत्यादी. मयत खातेदारांचे वारस तपास १०० टक्के पूर्ण करणे कामी अर्ज स्वीकारणे, सातबारावरील अनावश्यक इतर हकातील बोजे कमी करणे. पिक पाहणी, agristack बाबत कामे (खरीप, रब्बी व संपूर्ण वर्ष) बाबत माहिती देणे. विद्यार्थ्यांसाठी लागणारे आवश्यक दाखले अर्ज स्वीकारणे व वितरीत करणे. आधी कामांचा समावेश
होता.

शिबिरात महसूल गाव उमराठ खुर्दच्या सुमारे ६० स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित राहून विविध कामांची माहिती घेऊन अनेकांनी संबंधित कामांसाठी अर्ज सुद्धा दाखल केले.

शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी मंडळ अधिकारी संतोष सावर्डेकर, हेदवी सजाचे ग्राम महसूल अधिकारी सुशिल परिहार, सोबत नरवण सजाचे ग्राम महसूल अधिकारी भालचीम, कोतळूकच्या ग्राम महसूल अधिकारी साधना, कोतळूकचे महसूल सेवक अमित आरेकर व हेदवीच्या महसूल सेवक जान्हवी कांबळे यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, पोलिस पाटील वासंती आंबेकर, वाडीप्रमुख महादेव आंबेकर, मोहन आंबेकर, अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, मदतनीस निलम जोशी, मालती आंबेकर उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 21/Jan/2025