राजन साळवींचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची आज एसीबी चौकशी

रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा कायम असल्याचे चित्र आहे.

दिनकर सावंत हे आज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात ते पार्टनर होते.

काही दिवसापुर्वी दिनकर सावंत यांना acb ची नोटीस आळी होती. दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागिदार म्हणुन असतानाच्या टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली आहेत.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वाॅल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र काम केले होते. मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत याची चौकशी होणार आहे.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 22-01-2025