चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. महाविद्यालयातील तृतीय वर्ष संगणक विज्ञान (Cs) ची विद्यार्थिनी व महाराष्ट्र गर्ल्स बटालीयनची कॅडेट ज्युनियर अंडर ऑफिसर अमृता राजन माजलेकर हिने पुणे येथे झालेल्या ७७व्या आर्मी परेडमध्ये सहभाग अमृता माजलेकर घेतला. याबद्दल तिचे कौतुक होत आहे. ही परेड कायम दिल्ली येथे होत असे. मात्र, यावर्षी ती दक्षिण कमांड पुणे येथे आयोजित करण्यात आली. या परेडमध्ये देशातील आर्मी, नेव्ही, एअर फोर्स मधील अनेक रेजिमेंटस् सहभागी होतात. यावर्षी प्रथमच एन.सी.सी. चा ग्रुप सहभागी झाला. १ महिन्याच्या कठोर प्रशिक्षण व निवड प्रक्रियेतून अमृताची निवड करण्यात आली. विला महाविद्यालयातील एन.सी.सी. ऑफिसर कॅ. नमुना माने, लेफ्टनंट प्रा. मधूसुदन माने, सहा. महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संघन मिश्र यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल तिचे संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, नियामक समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. माधव बापट, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 22/Jan/2025














