रत्नागिरी : ऑफ्रोह महिला आघाडीचा मेळावा संपन्न

रत्नागिरी : तुमचे जीवन उत्तम आहे. तुम्ही प्रसन्न आहात. पण तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूचे इतर लोकं जर प्रसन्न होत असतील तर तुमचं जीवन सर्वोत्तम आहे. चार वर्षात ऑफ्रोहने केलेले काम कौतुकास्पद आहे, वर्षानुवर्षे संघटना काम करतात पण यश मिळत नाही पण ऑफ्रोह व आपल्यामध्ये ती शक्ती आहे, त्यामुळेच हे यश मिळालं आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री, N-6 आयसक्रीमच्या संचालिका व महावितरण रत्नागिरी परिमंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन विभाग) सौ. प्रणाली निमजे यांनी काढले.

ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महिला आघाडी शाखा रत्नागिरीच्या वतीने नुकताच कुवारबाव (ता. रत्नागिरी) येथील जेष्ठ नागरिक संघ सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य या होत्या.

या महिला मेळाव्यात ‘राजमाता जिजाऊ व सध्याची परिस्थिती’या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान, हळदीकुंकू कार्यक्रम व सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ऑफ्रोह चे सभासद टिकून रहा. माझं काम झालंय. आता माझा प्रश्न सुटलाय. आता मला काय करायचं आहे समाजाशी? असा विचार डोक्यात न आणता पुढे आपण आपल्या येणा-या पिढीचा प्रश्न हाती घेवू या.. त्यांना न्याय मिळवून देवू या.. अशी ग्वाही यावेळी ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 23/Jan/2025