रत्नागिरी : दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनींची नॅशनल डॉजबॉल संघात निवड

रत्नागिरी : दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या प्रिया मंदार अजगोलकर, अंतरा अनंत वरवटकर, रिया कैलास पावसकर व नंदीनी रवींद्र जाधव या चार विद्यार्थीनी आता नॅशनल डॉजबॉल संघातून खेळणार आहेत.

सैतवडे सारख्या लहान गावातून काहीही प्रोफेशनल रिसोर्सेस नसताना नॅशनल संघात या चार विद्यार्थिनींची निवड होणे ही खूप अभिमानाची बाब आहे. या संघाचे कोच शाळेच्या शिक्षिका श्रीमती ऋतुजा राजेश जाधव मॅडम असून त्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर यांचेसुद्धा विशेष सहकार्य या मुलीना लाभले आहे. तसेच या मुलींना नॅशनल लेव्हल पर्यंत पोहचविण्यात मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा मोठे योगदान आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 23/Jan/2025