हातखंबा पोलिस चौकीत पोलिस हवालदाराला सर्पदंश

रत्नागिरी : हातखंबा पोलिस चौकीत सेवा बजावत असणाऱ्या पोलिस हवालदाराला सर्पाने दंश केला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संजय मधुकर जाधव (वय ५० रा. फगरवठार, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) रात्री सव्वानऊच्या सुमारास मदत केंद्र हातखंबा पोलिस चौकी येथे घडली. पोलिस हवालदार जाधव हे रात्री मदत केंद्रात सेवा बजावत असताना सव्वा नऊच्या सुमारास दरवाजात उभे राहिले असता अचानक त्यांना घोणस जातीच्या सर्पाने दंश केला. सहकारी पोलिस जमादार नाटेकर यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 28-01-2025