सुदैवाने जीवितहानी टळली, टाइल्सचे मोठे नुकसान
चिपळूण :
Savarde Container Accident Mumbai Goa Highway अंतर्गत मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथील मुद्रा हॉटेलसमोर सोमवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास लादीने (टाइल्स) भरलेला ४० फुटी कंटेनर अचानक पलटी झाला. या अपघातात कंटेनरमधील लाद्यांचा चक्काचूर होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बॅरिगेड्स उभारून एकेरी वाहतूक सुरू
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर अपघातामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी बॅरिगेड्स उभारून एकेरी वाहतूक सुरू ठेवली.
लाद्या फुटून मोठे नुकसान; सकाळी वाहतूक पूर्ववत
या अपघातात कंटेनरमधील सर्व टाइल्स फुटल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत महामार्गावर पसरलेल्या फुटलेल्या लाद्या बाजूला हटवण्याचे काम वेगाने सुरू होते. अखेर सकाळी रस्त्यावरील ढिगारा हटवून महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत मोकळा करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 07-10-2026














