एसटीची भाडेवाढ रद्द करा, राजापूरात शिवसेनेचे आंदोलन

राजापूर : एसटीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एसटीची झालेली भाडेवाढ रद्द करा या मागणीसाठी मंगळवारी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राजापूर एसटी डेपोसमोर शिवसैनिकांनी चक्का जाम आंदोलन छेडले.

यावेळी एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

महागाईचा आगडोंब उसळलेला असताना एसटीच्या तिकीट दरामध्ये 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. या दरवाढीच्या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राजापूर एसटी डेपोसमोर चक्का जाम आंदोलन छेडले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांना एसटी भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, नरेश दुधवडकर, शहर संघटक वीणा विचारे, उपशहरप्रमुख उमेश कोळवणकर, श्रद्धा धालवलकर, मंदा शिवलकर, प्रकाश गुरव, विनय गुरव, अनिल कुडाळी, गोविंद चव्हाण, विजय गुरव, प्रतिक्षा मांजरेकर, स्नेहा उगले, संजय गोडांबे, विजय अमरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 29-01-2025