१,६५५ रुपयांची १५ लिटर गावठी दारू जप्त
रत्नागिरी :
Ratnagiri Illegal Liquor Action अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील ओरी देणवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्या एका संशयिताविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिस पथकाने सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३५ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.
संशयित आरोपीची ओळख आणि पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गोविंद शिंदे (वय ५८, रा. ओरी देणवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई आशिष राहाटे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निवळी ते गणपतीपुळे मार्गावरील जंगलात छापा
संशयित आरोपी संजय शिंदे हा सोमवारी सायंकाळी ओरी देणवाडी येथील निवळी ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या घोगऱ्या किंवा जंगलमय भागात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून होता. पोलिसांनी छापा टाकून त्याच्या तावडीतून १,६५५ रुपये किमतीची तब्बल १५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 07-10-2026














