लांजा : शिवसेना (ठाकरे गट) नवनिर्वाचित पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, महिला तालुका संघटक पूर्वा मुळ्ये यांचा लांजा तालुक्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मंगळवारी लांजा येथे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, महिला तालुका संघटक पूर्वा मुळ्ये यांचे रवींद्र डोळस, परवेझ घारे, युवराज हांदे, लक्ष्मण मोयें, शरद चरकरी, राजेंद्र सुर्वे यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 29-01-2025













