चिपळूण : तालुक्यातील तोंडली भोकरीचे भाटले ते कळंबटेवाडी तोंडली सहाण या रस्त्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी रस्ता तयार करून दिला. रस्ता डांबरीकरणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी या रस्त्याला ४ कोटी ७ लाख ५५ हजार रकमेची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
गुहागर विधानसभा व रायगड लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या तोंडली येथील भोकरीचे भाटले ते कळंबटेवाडी तोंडली सहाण ग्रामा नं. ३० या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. स्थानिक ग्रामस्थ सतत मागणी तसेच पाठपुरावा करत होते. त्यामुळे ग्रामस्थांची मदत घेऊन सावंत यांनी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत केली. स्वतःचे जेसीबी, कामगार, डंपर, रोलर सर्व काही नियोजन करून दिले होते. या खराब रस्त्यामुळे ३ वर्षापूर्वी एसटी, रिक्षा, रुग्णवाहिकासुद्धा बंद झाली होती. त्या वेळी प्रधानमंत्री आमसडक योजनेच्या अधिकारांना घेराव घालून आक्रमक भूमिका घेतली होती. त्या वेळी प्रभाकर सावंत, विलास सावंत, सतीश सावंत, मुरलीधर सावंत, पांडुरंग सावंत, विश्वनाथ सावंत, महादेव कांबळे, गुणाजी कळंबटे, दिलीप कांबळे, रमेश कावळे, प्रकाश कळंबटे आदी ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
या प्रकरणात पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, माजी पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार भास्कर जाधव, अनिल परब, माजी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहकार्य केले, माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कित्येक वर्षाची मागणी पूर्ण झाली. परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याची समस्या निकाली निघाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या कामाची निविदा प्रक्रियादेखील पार पडली. स्थानिकांची अनेक होत असल्याने मी त्यांच्या सोबत राहून रस्त्याचे काम दर्जेदार काम करून घेणार आहे. संदीप सावंत, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 29/Jan/2025













