दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांची घेणार भेट

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरुन धावणारी दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजरसाठी दि. 29 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ आणि कोकणवासीय मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेणार आहेत. यावेळी या दोन्ही गाड्या सुरू करण्याबाबतची मागणी करुन अंतिम इशारा देण्यात येणार आहे.

मध्यरेल्वेने दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर गाडी रद्द करुन त्यावेळेत दादर-गोरखपूर ही गाडी सुरू केली. दादर-रत्नागिरी गाडी रद्द केल्यामुळे कोकणवासियांवर अन्याय झाला आहे. दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या गाड्या सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ आणि कोकणवासीय मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांना भेटणार आहेत आणि दादर-रत्नागिरी व दादर-सावंतवाडी या गाड्या सुरु करण्याबाबत पुन्हा मागणी करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 29/Jan/2025