दापोली बसस्थानकात उबाठा शिवसेनेकडून भाडेवाढीचा निषेध

दापोली : गोरगरिबांना लुबाडणाऱ्या या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर पाय, एसटीची भाडेवाढ मागे घ्या, शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आशा गगनभेदी घोषणा देत जिल्हाप्रमुख संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दापोली बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर काल चक्का जाम आंदोलन केले.

एसटीची भाडेवाढ मागे घेण्याबाबत आगरप्रमुख उबाळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, नगराध्यक्ष ममता मोरे, संदीप चव्हाण, विक्रांत गवळी, नरेंद्र करमरकर, रमेश पांगत, रमेश भैरमक्कर, अनिल जाधव, अनंत महाडिक, सिंधुताई भाटकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 30/Jan/2025

Ratnagiri Khabardar add image