रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयास डीबीजे जीओ स्पर्धेचे विजेतेपद

रत्नागिरी : डीबीजे महाविद्यालयात येथे भूगोल विभागाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने (स्वायत्त) सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे हे नववे वर्ष असून, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील संघांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटात स्वतंत्रपणे सात स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रसिद्ध मराठी अभिनेता ओमकार भोजने काही काळ उपस्थित राहिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीचे विद्यार्थीही सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झाले.

फोटोग्राफी प्रथम क्रमांक आणि पीपीटी सादरीकरण द्वितीय क्रमांक-सेजल मेस्त्री, नकाशा भरणे प्रथम क्रमांक श्रीराज रावणांग आणि सानिका बामणे, प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक श्रीराज रावणांग, व्हिलॉग स्पर्धा प्रथम क्रमांक आणि पर्यटन नियोजन स्पर्धा द्वितीय क्रमांक पूर्वा भरणकर व अभिषेक शेलार यांनी प्राप्त केला. याप्रमाणे सात स्पर्धेत चार प्रथम क्रमांक व दोन द्वितीय क्रमांकाची पारितोषिके मिळवून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या स्पर्धेसाठी प्रा. विनायक गावडे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली.

या यशाबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य आणि भूगोल विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई तसेच कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 30/Jan/2025