रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले कोळंबी संवर्धनाचे प्रशिक्षण

रत्नागिरी : डहाणू येथे आयोजित केलेल्या कोळंबी संवर्धन कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तलावातील कोळंबी संवर्धन पद्धत, तलावाचे डिझाईन, लागणारी वायूविजन यंत्रणा, पाण्याचे मापदंड, कोळंबी आरोग्य व्यवस्थापन व इतर उपकरणे हाताळणे आणि त्याचे व्यवस्थापन व मार्केटिंग या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठांतर्गत शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या सात विद्यार्थ्यांसाठी ‘अॅक्वाकल्चर इंजिनिअरिंग’ या विषयांतर्गत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू येथे कोळंबी संवर्धन
कार्यानुभव प्रशिक्षण उत्साहात झाले.

डहाणू-पालघर येथील जतिन केनी यांच्या मालकीच्या कोळंबी संवर्धन केंद्रात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केणी हे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या सहाव्या बॅचचे विद्यार्थी असून त्यांनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. इतर ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर २०२२ पासून त्यांनी स्वतःचा कोळंबी संवर्धन हा व्यवसाय सुरू केला. या कार्यानुभव प्रशिक्षणात मस्त्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कुणाल बिडू, विपुल मोहिते, विष्णूकांत पवार, विजय बोलभट, प्रसाद जाधव, प्रथमेश जाधव, ओसामा खोत यांनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी केले. केनी अॅक्वा फार्मचे अधिकारी, कर्मचारी सहकायनि मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम संस्थेचे प्राचार्य सहयोगी अधिष्ठाता डॉ. आशीष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 30/Jan/2025