रत्नागिरी : ‘कला का ना का’, यात्रा एकांकिकाना रसिकांकडून वाहवा

रत्नागिरी : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे रत्नागिरीकरांसाठी विनामुल्य झालेल्या एकांकिका ‘कला का ना का’ व ‘यात्रा’ रंगतदार झाल्या, कोल्हापूर येथील देशभक्त रत्नाप्पाअण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या एकांकिकांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. लेखन आणि दिग्दर्शनाची वाहवा झाली.

पुरषोत्तम करंडक महाअंतिम फेरीतील दोन्ही एकांकिकांचे रसिकांनी स्वागत केले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश दळी, लेखक अनिल दांडेकर, अमेय धोपटकर तसेच नाट्य परिषद सदस्य व ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते.

देशभक्त रानाप्याअण्णा कुंभार महाविद्यालयाच्या ‘कला का ना का’ या एकांकिकेने सुरवात झाली. दिग्दर्शन आणि लेखकाच्या संकल्पनेतून नटलेल्या या एकांकिकेला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. शैक्षणिक विषयावर भाष्य करणारी ‘कला का ना का’ एकांकिका उत्तरोत्तर रंगत गेली. शाळेच्या कार्यक्रमात नाट्य नृत्य, पोवाडा मुले सराव करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर शाळेतील मुलगी पोवाडयाचे लिखाण करते. पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण झाले होते की नाही, या प्रश्नावर संपूर्ण एकांकिका फिरते. तिचे शिक्षक, वडील हे तसेच माध्यमं महाराजांचे शिक्षण झाले की, नाही यावर भाष्य करत नाहीत आणि इतिहास हा पुरवा मागत असतो. ती मुलगी खूप त्रासते. शेवटी तिची आई व बहिणाबाईच्या कविता ऐकवते. त्या वेळी तिच्या मनात प्रकाश पडतो, अशी एकांकिकेची कथा आहे; मात्र ही एकांकिका सादर करताना राजकीय, सामाजिक याचे भान ठेवण्यात आले होते. अतिशय सुंदर अशा लिखाणात, मुलांच्या अभिनयात ही एकांकिका रंगली, त्यानंतर ‘यात्रा’ ही एकांकिका झाली.

आई आणि मुलाचा प्रवास दाखवण्यात आला. मुलगा तापट असतो. आई म्हातारी असली तरी त्यांच्यावर तिचं प्रेम जास्त असते; पण ती खाष्ट असल्यामुळे तो रागवतो. त्यांचा राग अनावर होऊन एके दिवशी चक्क आईच्या पायावर बादली मारतो. ती जखमी होते. तो घरातून निघून जातो. त्या एसटीमध्ये त्याची आईही असते. ती डॉक्टरकडून आली असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिथून त्या दोघांचा प्रवास सुरू असतो. दोघांचे संभाषण अटीतटीचे दाखवण्यात आले आहे; पण बालपणाची आठवणही मुलाला आई करून देते. तोही आईच्या कुशीत जातो. शेवटी घरी येतो तेव्हा त्याला आईची प्रेतयात्रा दिसते. अशीही यात्रा एकांकिकेची कथा आहे.

यांना मिळाली पारितोषिके
दोन्ही एकांकिकांमध्ये सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचे पारितोषिक पार्थ पाटणे या विद्यार्थ्यांला, तर स्त्री अभिनय अक्षया किसन बारटक्के यांना मिळाले आहे. प्रमुख भूमिका साकारल्या तर या एकांकिकेसाठी लेखक अजय पाटील, दिग्दर्शक महांतेश हिरेमठस्वामी यांनाही पारितोषिक मिळाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 30/Jan/2025