रत्नागिरी : श्रीमंत पेशवाई चषक कॅरम स्पर्धा २ फेब्रुवारीपासून

रत्नागिरी : शहरातील मारुती आळी येथील श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव, श्री हनुमान मित्रमंडळ आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तिसरी श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा राधाकृष्ण मंदिर येथे २ ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटात होईल.

कॅरम स्पर्धेत प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धक असणे आवश्यक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येतील. स्पर्धकांनी प्रवेशिका उद्या (ता. २९) पर्यंत तालुका प्रतिनिधींकडे द्यावयाच्या आहेत. कुमार, कुमारी, किशोर व किशोरी गटाचे सामने २ फेब्रुवारीला खेळवण्यात येतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 30/Jan/2025