पाली : रासायनिक उद्योग क्षेत्रातील तरुणांना नोकरी व रोजगारासाठी अत्यंत आवश्यक असणारे केमिकल प्लॅन्ट असिस्टंट ऑपरेटर हे प्रशिक्षण मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट, कलेक्टिव्ह गुड फाऊंडेशन व घरडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण, लोटे व खेड भागातील युवक व युवतींसाठी मोफत देण्यात येणार आहे.
याचा कालावधी २ महिने असून शैक्षणिक पात्रता: १२ वी,पदवीधर,वय १८ ते २७ वर्ष आहे. प्रशिक्षण फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू होणार असून ते घरडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल, खेड येथे होणार आहे. केमिकल कंपनी मध्ये कामाचा अनुभव असणाऱ्यां साठी प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहिती करिता सुमित आडमकर ७७४४००५६९६, अवधूत पावसकर ८९९९५९३१०१ ,अकबर शेख यांच्याशी संपर्क साधावा किंवा https://forms.gle/F7jCnH3v6SzxFoPZ6 या लिंकवर आपले रेजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 30-01-2025













