खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील अवघड वळणावर गुरुवारी (ता. ३०) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका मालवाहू ट्रक संरक्षक भिंतीवर आदळून अपघात झाला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याकडून मुंबईला जाणारा ट्रक भोस्ते पाट उतरत असताना तीव्र उतार असलेल्या अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीला धडकला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून, ट्रकचे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 31/Jan/2025













