देवरुख : आपल्या शिक्षणाचा श्री गणेशा हा पाटीवरील पेन्सिलने वा फळ्यावरील खडूने होत असतो. याच खडूला विविध आकार देत बाहुली व विविध पक्षी साकारण्यात संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील राजेंद्र केळकर हस्त कला विकसित केली आहे. त्यांच्या हस्त कौशल्यातून साकारलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू नववधूंच्या विवाह सोहळ्यातील रुखवतात शोभा वाढवत आहेत. या वस्तू पाहून अनेकांना केळकर यांच्या कलेची भुरळ पडत आहे.
हॉटेल सनराईज या ठिकाणी राजेंद्र केळकर हे सेवा देत आहेत. केळकर यांना लहानपणापासूनच विविध वस्तू साकारण्याचा छंद होता. यातच नाशिक येथे वडिलांच्या नोकरीनिमित्ताने शिक्षण पार पडत असताना केळकर यांना शाळेमध्येच कला शिक्षणाच्या तासात विविध वस्तू बनविण्याचे शिक्षण देण्यात आले. याचाच आधार घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये आपली कल्पकता त्यात आणून केळकर यांनी वस्तू बनवण्याचा छंद पुढे जोपासला.
टाकावू खोक्यांपासून ते कुत्रा, हत्ती, खुर्ची बनवतात. नखांच्या सहाय्याने खडू कोरुन त्यावर स्त्रीच्या डोक्यावर सात हंडे असलेली बाहुली तयार करतात. खडू हा अत्यंत ठिसूळ असतो, तो लगेच तुटू शकतो. यामुळे खडूवर कोरीव काम करत असताना काळजी घ्यावी लागते. तयार झालेल्या बाहुली, कावळा, पोपट व विविध पक्षी यांना सुंदर रंग देऊन बाहुली व पक्षांना जिवंतपणा आणण्याचे काम केले जाते. या कामाबरोबरच केळकर हे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूदेखील बनवत असतात. विवाहातील रुखवत सजविण्यासाठी लहान लहान घर संसारातील वस्तू देखील बनवतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 31/Jan/2025













