चिपळूण : तालुक्यातील फुरूस चव्हाणवाडी येथील धरणासाठी भूसंपादीत झालेल्या जमिनीचा ७४ टक्के मोबदला लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना या मोबदल्याचे वितरण करण्यात आले.
प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी दि.३० रोजी सकाळी झालेल्या मोबदला वितरणप्रसंगी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे व जमीनधारक उपस्थित होते. शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत फुरुस चव्हाणवाडी येथील धरण बाधीत ७४ टक्के भूधारकांना भूसंपादन मोबदल्याचे वितरण करण्यात आले. जिल्हा जलसंधारण, मृद व जलसंधारण विभाग यांच्यावतीने या ठिकाणी २१.८९ हे. क्षेत्र संपादीत करण्यात आले आहे. यातील ७४ टक्के लोकांना निधी वितरित केला. यामध्ये ४१२ अंतिम निवारा रक्कमेअंतर्गत ४ कोटी १ लाख ७५ हजार, २०७ जणांना २ कोटी ९६ लाख ३५ हजारांचे वितरण करण्यात आले तर अजूनही जमिनीसंदर्भात तक्रार आणि केवायसी अपूर्ण राहिल्याने २०५ लोकांचा मोबदला वितरित करणे शिल्लक आहे.
या प्रकल्पांतर्गत १ कोटी ५ लाख ३९ हजार रूपये अजूनही वितरीत करावयाचे आहेत. या प्रकल्पामुळे पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. पशुपालन, कृषी उत्पादनासाठी या पाण्याचा मोठा वापर होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 31/Jan/2025














