चिपळूण : पोफळी प्राथमिक शाळेत ‘एक दिवस पालकांचा’ उपक्रम

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी, संचालित प्राथमिक शाळा पोफळीमध्ये पालकांनी आनंदाने, उत्तम नियोजनाने व उत्स्फूर्तपणे एक दिवस पालकांचा हा उपक्रम साजरा केला. या दिवशी पालकांना शिक्षक होऊन शाळा चालवण्याची संधी दिली जाते. या उपक्रमांतर्गत परिपाठ, अध्यापन, विद्यार्थी-पालक-शिक्षक एकत्रित स्नेहभोजन, विविध खेळ, ज्ञानकुंभ, हळदी-कुंकू, पारितोषिक वितरण, पालकांचे मनोगत व समारोप असे नियोजन केलेले होते.

उपक्रमाची सुरुवात परमेश्वर गुळवे यांच्याहस्ते भगवान परशुराम पूजन करून करण्यात आली. पालक-शिक्षक यांनी मराठी, गणित व इंग्रजी या विषयांचे अध्यापन करण्याचा अनुभव घेतला. अध्यापनानंतर विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले. उपस्थित महिला पालकांसाठी संगीत खुर्ची खेळ घेण्यात आला. ज्ञानकुंभ हा नाविन्यपूर्ण उपक्रम पालकांसाठी घेण्यात आला. यामध्ये चिठ्ठयांवर वेगवेगळे विषय लिहून देण्यात आले होते.

त्याप्रमाणे उपस्थित पालकांनी आपले अनुभव व मत व्यक्त केले. यावेळी विविध खेळांमध्ये यश मिळविलेल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक मिसाळ, शिवानी शिंदे, प्रतिभा धुमाळ, साधना गायकवाड, रिता चव्हाण, अक्षता साळवी तसेच सरिता मानकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 31/Jan/2025