चिपळूण : डी. बी. जे महाविद्यालयातील आर्या तांबे हिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे महाविद्यालयातील विद्यार्थिनी आर्या तांबे हिची खेलो इंडिया स्पर्धेकरिता निवड झाली आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या ऑल इंडिया योगा स्पर्धेत २२० विद्यापीठातील एकूण २ हजार ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने पाचवा क्रमांक मिळवून खेलो इंडिया या भारत सरकारच्या स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले. मुंबई विद्यापीठ योग संघात आर्या तांबे हिचा समावेश होता. ऑल इंडिया स्पर्धेनंतर प्रथम आठ येणाऱ्या संघाची खेलो इंडिया स्पर्धेकरिता तिची निवड होते. याबद्दल आर्या तांबे हिचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, जिमखाना विभागाचे चेअरमन वामन जोशी, योगा प्रशिक्षक रणवीर सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन विलास जोशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. सम्राट माने, क्रीडा शिक्षक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 31/Jan/2025