वाटूळ येथे १० व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा उद्या उद्घाटन सोहळा

राजापूर : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आणि वाटूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वाटूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा वै.ह. भ.प. श्री. हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्य नगरीत शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी वाटूळ सरपंच श्रीमती निता चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण तर संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिध्द उद्योजक मधुकर गोमणे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ग्रंथाली प्रकाशनचे ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल भूषविणार आहेत.

यावेळी सुप्रसिध्द प्रवचनकार भारताचार्य सु. ग. शेवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, सिने नाटय अभिनेते महेश कोकाटे, माजी संमेलनाध्यक्ष प्रकाश देशपांडे, अड. विलास कुवळेकर, लेखक धीरज वाटेकर आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

प्रास्ताविक संघ सरचिटणीस प्रमोद चव्हाण करणार असून स्वागताध्यक्ष ह.भ.प. बाळकृष्ण चव्हाण असणार आहेत.

दुपारी २ ते ३ या वेळात युवा व्यासपीठ, सायं. ३.३० ते ६ साहित्यिक विचार मंथन कार्यक्रमात विविध वक्त्यांची व्याख्याने, सायं. ६.३० ते रात्रौ ८ कवी संमेलन होणार आहे. तर रात्रौ ८.३० ते ९.३० वाजता निमंत्रित कवी संमेलन तर रात्रौ ९.३० ते ११.३० या वेळात संगीत रजनी कला दर्पण प्रस्तुत भक्तीरंग या गायन व बासुरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार असून त्याचे उद्घाटन सकाळी ८.३० वाजता होणार आहे. या सोहळयाचे अध्यक्षस्थान राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड भूषविणार आहेत. तर उद्घाटन सुप्रसिध्द उद्योजक रमेश गुरव यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी मी सावित्रीबाई फुले बोलतेय हा एकपात्री प्रयोग प्राचार्या वृषाली रणधीर सादर करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, सिंधु रत्न समृध्दी योजनेचे सदस्य अजित यशवंतराव, उद्योजक प्रसाद पाटोळे, उद्योजिका सौ. उल्का विश्वासराव आदींसह अन्य मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

यावेळी सर्वांनी उपस्थीत रहावे, असे आवाहन राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई व वाटूळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 31-01-2025