संगमेश्वर : शिरंबे मावळतीवाडी (ता. संगमेश्वर) येथे पोलिसांनी विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ९५० रुपयांची ९ लिटर दारू जप्त केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय जगनाथ खेडेकर (वय ५५. रा. शिरंबे-मावळतीवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिरंबे मावळतीवाडी येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना ९५० रुपयांची ९ लिटर दारू विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ खाडे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 31/Jan/2025














