रत्नागिरी : : आंबा पिकावरील फूलकीड नियंत्रण पथदर्शी उपक्रमांतर्गत शेतकरी गोळप येथील उमंग प्रकाश साळवी यांच्या प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या आंबा फळबागेला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख विनायक जळगावकर यांनी भेट दिली.
डॉ. जालगावकर यांच्यासोबत उमंग साळवी यांनी चर्चा करून सध्याची परिस्थिती सांगितली. त्यांना मिळालेल्या सकारात्मक परिणामाबाबतही समाधान व्यक्त केले. यावेळी कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, मंडल कृषी अधिकारी कुलदीप पवार यांनी आंबा प्रात्यक्षिक बागेचे सर्वेक्षण केले. कोकण कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी विद्यापीठाचे कीड व्यवस्थापनासाठीचे कीटकनाशके शेड्युल आणि नवीन कीटकनाशकांच्या चाचण्या यासाठी प्रत्येकी दोन प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक क्षेत्राचे शास्त्रज्ञांमार्फत निरीक्षणे व पाहणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 31/Jan/2025














