चिपळूण : प्रजासत्ताक दिनानिमित्त गोवळकोट भोईवाडी येथील महिला मंडळाच्या वतीने वाशिष्ठी नदीचे पूजन करण्यात आले. यावेळी वाशिष्ठी नदीची ओटी भरण्यात आली. दरवर्षी भोई समाजातील महिला मंडळाच्यावतीने हा आगळावेगळा उपक्रम केला जातो. पूर्वजांपासून सुरू असलेल्या मासेमारी या व्यवसायासाठी वाशिष्ठी नदीवर अवलंबून असणाऱ्या भोई समाजाचे कुटुंब या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाद्वारे वाशिष्ठीचे ऋण उतरवण्याचा प्रयत्न करतात.
यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गोळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडीतील सर्व महिलांनी या उपक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ महिलांसोबत तरुण महिला मंडळाचा मोठा सहभाग असतो. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सरस्वती कासेकर, संजीवनी जुवळे, दीपाली जुवळे, प्रिया कासेकर, निर्मिती कासेकर, अंजली सैतवडेकर आदींसह अन्य महिला उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 01/Feb/2025














