दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरील गणपती मंदिरात १ फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी ८ वाजता संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय भजन मंडळ यांच्या दिंडीचे आगमन व भजन सेवा, जन्मोत्सव कीर्तन ह. भ. प. विजय निस्तुरे, दत्तसेवक भजन मंडळ पाडले यांची भजन सेवा, विमलेश्वर भजन मंडळ मुरली रात्री ८ वाजता, दत्तगुरु भजन मंडळ कातळकोड भजन, श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ भंडारवाडा भजन असे कार्यक्रम होणार आहेत. दि. २ रोजीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त पाजपंढरी ते गणपती मंदिर अशी एसटीची सेवा पुरवण्यात येणार आहे तर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थान यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 01/Feb/2025














