पाली-बौद्धवाडी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : दम्याचा त्रास जास्त जाणवू लागलेल्या वृद्धाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. लवू शिवराम सावंत (वय ७०, रा. बौद्धवाडी-पाली, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सावंत यांना दम्याचा जास्त त्रास जाणवू लागला. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 01-02-2025