दापोली : तालुक्यातील पालगड येथील किरण दळवी यांच्या सलूनला व बाजूलाच असलेल्या जनरल स्टोआला अचानक आग लागली यामध्ये सुमारे ५ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
किरण दळवी ३० जानेवारीला नेहमीप्रमाणे सलून बंद करून घरी गेले होते. काही वेळातच गावातील एका व्यक्तीने किरण दळवी यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे त्यांना सांगितले. सलून व जनरल स्टोअर घराजवळच असल्याने दळवी यांनी लागलीच तिकडे धाव घेतली, मात्र, तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. ही गावकऱ्यांना समजताच गावकरी मदतीसाठी धावले. गावातील काही गाडीवाल्यांनी गाडीतून लगेच टाकी भरून पाणी आणले व आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र, रौद्ररूप धारण केलेल्या आगीपुढे कुणाचेच काही चालले नाही. काही वेळातच दुकानाची राखरांगोळी झाली.
ही घटना कळताच दापोलीतून तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष मंगरा शिंदे, तालुका सचिव शैलेश चव्हाण तालुका खजिनदार प्रीतम शिंदे, शहराध्यक्ष योगेश दळवी, माजी अध्यक्ष महेंद्र चव्हाण आदी पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन किरण दळ्वी त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. या दुर्घटनेमध्ये सलूनचे आणि जनरल स्टोअरचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. काही दिवसांपूर्वीच किरण दळणी यांनी सलून व्यवसायासाठी लागणारे साहित्य आणि जनरल स्टोअरचे सामान भरले होते. आगीमध्ये सलून खुर्च्या आरसे, गिऱ्हाईक बसण्याचे आसन, इलेक्ट्रिक मशीन, वस्तरा, कैची, फणी क्रीम व इतर सौंदर्यप्रसाधने, फ्रीज, पंखे, वीज मीटर अशा अनेक वस्तु जळून. खाक झाल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 01/Feb/2025














