सावर्डे येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी व्याख्यान

सावर्डे : कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याविषयी व्याख्यान व काही प्रयोग दाखवण्यात आले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर यांनी या कायद्याचे महत्त्व विशद केले. मांत्रिक हे भूत उतरण्याच्या बहण्याने एखाद्या व्यक्तीला दोऱ्याने व साखळीने मारतात. आपल्या अंगामध्ये विशेष शक्ती असल्याचे भासवून तुमच्यावर करणी केली, चेटूक केले आहे. ते मी उतरवितो असे सांगून पैसा उकळला जातो. कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास मंत्रतंत्र, गंडेदोरे यासारखे उपचार करणे, तसेच पैशाचा पाऊस पाडणे, लिंबूतून रक्त काढणे, नारळ हातात घेऊन पाणी दाखवणे, जळता कापूर तोंडात घेणे इत्यादी प्रयोग त्यांनी करून दाखवले. यामागे विज्ञान काय आहे हे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तानाजी कांबळे यांनी केले. यावेळी जगन्नाथ साबळे, विलास डिके, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 05/Feb/2025