रत्नागिरी : येथील “रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाद्वारे” दरवर्षी ग्रंथालयीन कार्यकर्ता आणि सेवक यांना पुरस्कार देण्यात येतात यावर्षीचा आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी आणि ग्रंथालयीन चळवळीत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या श्रीकांत पाटील यांना गुहागर येथे संपन्न झालेल्या 48 व्या वार्षिक अधिवेशनात, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री दिलीप कोरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
श्रीकांत पाटील यांनी १९८६ पासून बसणि पंचक्रोशी ग्रंथालयाच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत “ब “वर्गापर्यंत प्रवास केला ,या प्रवासात महाराष्ट्र शासनाच्या नाट्य स्पर्धांमध्ये संस्थेला सांघिक आणि वैयक्तिक अशी अनेक बक्षीसे मिळवून देण्यासाठी, उत्तम नाटके सादर केली. ग्रंथालयाच्या नावावर अनेक प्रमाणपत्रे व रौप्य पदके आहेत. विशेष म्हणजे समाजसेवक बाबा दाते या आपल्या मित्राकडून तीन गुंठे जागा बक्षिस पत्राने मिळवून ग्रंथालयाची छानशी इमारत ,सर्वांचे सहकार्याने पूर्णत्वास नेली आहे.
गुहागर मध्ये संपन्न झालेल्या अधिवेशनात पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हा पुरस्कार माझ्या समवेत काम करणाऱ्या तसेच इमारतीचे कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचाच हा सन्मान असून लवकरच इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
डॉ.गजानन जी कोटेवार, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, श्री प्रशांत पाटील सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण विभाग, तसेच आयोजक ज्ञान रश्मी वाचनालय गुहागरचे अध्यक्ष श्री राजेंद्र आरेकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 06/Feb/2025














