गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी धोरण ठरवा : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात गुरुवारी राज्यातील तलाव ठेक्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री राणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. तलावांच्या ठेके वाटपात शिस्त आणण्याच्या सूचना देऊन मंत्री राणे म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थकारणास चालना देणे आणि ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवणे हा तलावांचे ठेके देण्याचा उद्देश आहे.

परवान्याबाबत कडक निर्बंध
राज्यात कोणकोणत्या संस्थांना कधी ठेके दिले आहेत. त्यांनी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे का? कधी केले आहे? याविषयी सविस्तर माहिती पुढील आठवड्यात सादर करावी. परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली आहे किंवा कसे याचीही माहिती त्यात समाविष्ट करावी. विभागाने मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 07/Feb/2025