चिपळुणात नवीन कायद्याविषयीची नागरिकांना माहिती

चिपळूण : अनेक नागरिकांना नव्याने लागू झालेल्या कायद्याची माहिती नाही. याबाबत समाजात जागृती होण्यासाठी तसेच नवीन कायद्याविषयीची नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी चिपळूण पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. विशेष सरकारी वकील अॅड. चिन्मय दीक्षित यांनी नव्या कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली.

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. नवीन कायद्याचा उद्देश यासह नवीन कायद्यातील बदल, कायद्याबाबत शंकेचे निरसन करण्याबरोबर या कायद्याविषयीची नागरिकांना ओळख व्हावी, त्याबाबत जागृती निर्माण व्हावी. यासाठी पोलिस विभागाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. चिपळूण येतील कार्यशाळेवेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी जुन्या व नव्या कायद्याविषयीचा आढावा मांडला. अॅड. दीक्षित यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीसुरक्षा संहिता, व भारतीय साक्ष अधिनियम याचे सखोल विश्लेषण केले.

तसेच पोक्सो कायदा, महिला व मुलींवर होणारा लैंगिक छळ याबाबतचे पुरावे आदीची माहिती दिली. सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक अनुराधा मेहेर यांनी तर आभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक विकास निकम यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 10/Feb/2025