गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे अन्नछत्र मंडळ अक्कलकोट ट्रस्ट यांचे वतीने श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमाअंतर्गत श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन आज दिनांक १२ फेब्रुवारी होणार आहे. हा कार्यक्रम गणपतीपुळे येथील स्वामीभक्त राजेश बापट यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पालखीचे आगमन, गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता पालखी प्रस्थान, बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद (भंडारा) रात्री आठ ते साडे दहापर्यंत, तर गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ पर्यंत असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभघ्यावा, असे आवाहन गणपतीपुळे येथील स्वामीभक्त राजेश बापट यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 12/Feb/2025












