चिपळूण : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून चिपळुणात १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराज पालखीचे आगमन होत आहे. चिपळुणातील स्वामी समर्थ परिवारातर्फे दर्शन सोहळ्याचे आयोजन वेस मारुती मंदिर पटांगणावर करण्यात आले आहे.
चिपळुणातील स्वामी समर्थ परिवारातर्फे गेली तेवीस वर्षे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती व पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील १४ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन सायं. ४. ३० वा. पाग पॉवर हाऊस येथे होणार असून तेथे परिवारातर्फे स्वागत केले जाणार आहे.
त्यानंतर पालखी मार्कडी येथील स्वामी समर्थ मठात नेण्यात येणार आहे. तेथे केळकर परिवारातर्फे पूजा केली जाणार आहे. त्यानंतर सायं. ५ ते ६.३० या वेळेत महाराजांच्या पालखीचे मठापासून टाळ, मृदंग, तुतारीच्या गजरात शोभायात्रेने वेस मारूती मंदिर येथे दर्शनस्थळ आगमन. सायं. ७ वा. भाविकांना पादुका व मूर्ती दर्शन. रात्री ९ ते १२ या वेळेत मालघर येथील विठ्ठल-रखुमाई मंडळाचे भजन, १५ रोजी पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत स्वामी पादुकांवर दुग्धाभिषेक, स. ८ ते १० वा. रावतळे येथील आचार्य राजाभाऊ केळकर व ब्रह्मवृंदाचे लघुरूद्र, १० ते ११ वा. स्वामी पाठ व नामजप, रात्री ९ वा. संगीत भजन. १६ रोजी पहाटे ५ वा. स्वामी चरणी दुग्धाभिषेक व धार्मिक कार्यक्रम, सकाळी ८ वा. नंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 12/Feb/2025













