गुहागर : शहरातील पोलीस परेड मैदानावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सात व्यावसायिकांना महसुल विभागाने अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. २४ फेब्रुवारीची अखेरची मुदत दिली असुन अन्यथा पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला आहे.
गुहागर शहरातील पर्यटनवाढीला समुद्रचौपाटीच्या आजुबाजुला असलेल्या छोटया व्यवसायिकांचे हे सहकार्य होत आहे. मात्र या व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देण्याचे काम कोणालाच करता आलेले नाही. समुद्रचौपाटीवर विनापरवाना उभारलेले गाळे बंदर विभागाने जमिनदोस्त केले होते. त्यानंतर या व्यवसायीकांनी पोलिस परेड मैदानावर आपला मोर्चा वळविला. येथील पर्यटकांना सेवा देण्यासाठी फिरत्या गाड्यांचा आधार घेतला. मात्र त्यानंतर थेट पेंडॉल उभे राहीले. यामुळे महसुल विभागाने याअगोदर ४ जानेवारी २०२४ रोजी सदर दुकाने काढण्याचे आदेश दिले होते. सदर कारवाई थांबविण्यासाठी येथील सर्व व्यवसायिकांना १० जानेवारी २०२४ व १८ जानेवारी २०२४ रोजी महसुल विभागाकडे पत्रव्यवहार करून सदर दुकाने हटविण्यासाठी काही महिन्याचा कालावधी मागितला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 13/Feb/2025














