श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीत कार्यक्रम

◼️ उद्या सुवर्णकारांची दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार

रत्नागिरी : सालाबाद प्रमाणे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे.

सर्व समाज बंधू भगिनींनी सकाळी ८.०० वा. श्रींच्या सवाद्य मिरवणुकीत सामील होण्यासाठी मंदिरात पारंपारिक वेशभुषेत उपस्थित रहावे तसेच संपूर्ण कार्यक्रमातील सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. प्रमोद द. खेडेकर, अध्यक्ष, श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सुवर्णकार मंडळ, रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्यतिथी निमित्त सर्व सुवर्णकार बांधवांची दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 14-02-2025