रत्नागिरी : विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हावासीयांचे आभार मानण्यासाठी आज रत्नागिरीत येत आहेत. या मेळाव्यात ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने, गणपतराव कदम यांच्यासह, आजू महाडिक, विलास चाळके, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. उबाठा चे जिल्हाप्रमुख विलास चाळके देखील आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने मोठी नामुष्की उबाठा वर आली आहे. एकंदर पहाता ऑपरेशन टायगर सुरु झाल्यावर उबाठा चा सुपडा साफ होताना दिसत आहे. आता उबाठा मध्ये उरले कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
या पक्षप्रवेशाने उबाठाला मोठा धक्का जिल्ह्यात बसणार आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मात्र जिल्ह्यात वाढणार असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिकांमध्ये मोठा फायदा मिळणार आहे. दरम्यान, या दौर्याची जय्यत तयारी झाली आहे. रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदानावर ही भव्य सभा व प्रवेश सोहळा पार पाडणार आहेत. दुपारी सव्वादोन वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री रत्नागिरीत दाखल होणार आहेत. त्यानंतर लगेचच सभेला सुरुवात होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 15-02-2025












