चिपळूण : सन १९७२ पासून अलोरे येथे परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित अलोरे हायस्कूलची इमारत मालकी व भाडेविषयक वाद संपुष्टात आला आहे. जलसंपदा विभागानेच प्रशालेची आजवरची वाटचाल व गुणवत्ता बघून तीस वर्षांचा करार करून जागा व इमारत संस्थेला दिली आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यापासून आलोरे, पोफळी व कोयना येथे मोठ्या संख्येने कामगार कर्मचाऱ्यांची वसाहत निर्माण झाल्या. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य विचारात घेऊन परशुराम एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेला शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शिक्षक वेतनेतर अनुदानातून प्रशालेतील अन्य खर्च भागत होते.
मात्र हे अनुदान अनेक वर्षे बंद झाल्यावर वीज, पाणी व भाडे भरणे अशक्य झाले. काहीवेळा जलसंपदा खात्याने शाळेला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला. अखेर संस्था व शासन यांच्यात समेट होऊन तीस वर्षे सामंजस्याने करार झाला. या कराराची प्रत कार्यकारी अभियंता नीतीश पोतदार यांनी सोसायटीचे उपकार्याध्यक्ष राजू कानडे, प्राचार्य विभाकर वाचासिद्ध यांच्याकडे सुपूर्द केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 17/Feb/2025
